किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.53°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२० डिसेंबर) – मुंबई १९९३ च्या सीरियल बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेननचा ३० वर्षांनंतर नवीन फोटो समोर आला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदप्रमाणे टायगर मेननही कराचीच्या डिफेन्स भागात एका आलिशान बंगल्यात राहतो. बंगल्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. टायगर मेमनचे खरे नाव इब्राहिम मेमन आहे. टायगरचे संपूर्ण कुटुंब मुंबईचे रहिवासी आहे. टायगर मेमनच्या कुटुंबाचे प्रमुख अब्दुल रज्जाक मेमन होते, ते एक व्यापारी होते. तो पत्नी हनीफा आणि सहा मुलांसह मुंबईच्या भिंडी बाजार परिसरात राहत होता आणि कुटुंबातील सर्वात लहान मुलगा इब्राहिम उर्फ टायगर मेमन याने ८० च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी हातमिळवणी करून काळा धंदा करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर टायगर मेमनने त्याचा दुसरा भाऊ याकूब मेमन हा चार्टर्ड अकाउंटंटचाही समावेश यात केला होता.
यानंतर १२ एप्रिल १९९३ रोजी मुंबईतील स्टॉक एक्स्चेंज बिल्डिंगपासून वेगवेगळ्या ठिकाणी १२ मालिका बॉम्बस्फोट घडवून देशाला हादरवून सोडले होते.त्यात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ७०० लोक जखमी झाले होते. या स्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत याकुब मेमनला १९९४ मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि टायगरचे वडील रज्जाक, आई हनीफा, भाऊ इसा आणि युसूफ, याकूबची पत्नी राहिना, मोठ्या भावाची पत्नी रुबिना यांनाही मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी करण्यात आले होते. मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल नोव्हेंबर २००६ मध्ये दिला. एकूण ६०० जणांची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात १०० जण दोषी सिद्ध झाले, तर मुख्य आरोपी टायगर मेमन फरार होता. मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागाबद्दल न्यायालयाने याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली आणि ३० जुलै २०१५ रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला फाशी देण्यात आली.