किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– नवाज शरीफ यांचा घरचा अहेर,
इस्लामाबाद, (२० डिसेंबर) – पाकिस्तानवर कोसळलेल्या आर्थिक संकटासाठी भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. लष्करामुळेच पाकिस्तान कंगाल झाला, असा घरचा अहेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला आहे. नवाज शरीफ १९९३, १९९९ आणि २०१७ मध्ये पंतप्रधानपदावर होते. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना ३१ जुलै २०१७ रोजी सत्तेपासून दूर जावे लागले.
आता ते चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्पप्न पाहात आहे. यानिमित्ताने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या आपल्या पक्षाच्या संभाव्य दावेदारांसोबत संवाद साधला. आज जी पाकिस्तानची आर्थिक अवस्था झाली आहे, ती भारत वा अमेरिका किंवा अफगाणिस्तानमुळे झालेली नाही. प्रत्यक्षात आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली असल्याचे नवाज शरीफांनी म्हटले. त्यांनी देशाच्या लष्करावरही टीका केली.
लष्करी अधिकार्यांनी २०१८ मधील निवडणुकीत घोटाळा करून निवडलेल्या व्यक्तीला (इम्रान खान) सर्वोच्च पदावर बसविले. परिणामी अर्थव्यवस्था कोसळल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी केला. देशातील न्यायाधीश लष्करातील अधिकार्यांच्या गळ्यात हार घालत असतात. त्यांनी घटनेचे उल्लंघन केले, तरी त्या बाबी वैध मानल्या जातात. परंतु, पंतप्रधानांचा मुद्दा येतो, त्यावेळी न्यायाधीश त्यांना पदावरून दूर करतात. १९९९ मधील एका सकाळी मी देशाच्या सर्वोच्च पदावर होतो. मात्र, सायंकाळच्या सुमारास मला दरोडेखोर जाहीर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.