किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पंतप्रधान मोदींकडून नव्या सदस्यांचे स्वागत,
जोहान्सबर्ग, (२४ ऑगस्ट) – भारताने ब्रिक्समधील विस्ताराला नेहमीच पाठिंबा दिला आहे. या सर्व देशांशी आपले सखोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. मला आनंद आहे की, तीन दिवसीय बैठकीत अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व असलेल्या संघटनांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, ब्रिक्सचा विस्तार हे दर्शवितो की, जगातील मोठ्या संघटना काळाबरोबर बदलल्या पाहिजेत. त्याचबरोबर जे देश पहिल्या टप्प्यात या संघटनेत सामील होऊ शकले नाहीत त्यांना या संघटनेचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी भारत आपले योगदान देईल. जेव्हा आपण ग्लोबल साऊथ म्हणतो तेव्हा ती फक्त एक राजनैतिक संज्ञा असते. आम्ही एकत्रितपणे भेदभावाला विरोध केला आहे. गांधींनी दक्षिण आफ्रिकेतच कृष्णवर्णीयांसाठी आवाज उठवला. त्यांनी डॉ. नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली. भारताने आफ्रिकेसोबतच्या संबंधांना प्राधान्य दिले आहे. १६ नवीन दूतावास उघडण्यात आले आहेत. हा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. अजेंडा-२०६३ अंतर्गत आफ्रिकेला जागतिक महासत्ता बनवण्यात भारत भागीदार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, चांद्रमोहिमेबद्दल आमचे अभिनंदन होत आहे. याकडे कोणत्याही एका देशाचे यश म्हणून पाहिले जात नाही, तर मानवतेचे यश म्हणून पाहिले जात आहे. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत आहे. चांद्रयान-३ चे दक्षिण ध्रुवावर लँडिंग हे केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मोठे यश आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आफ्रिकन देशांसोबत आहोत, कोविडमध्ये आम्ही आफ्रिकन देशांना लस आणि खाद्यपदार्थ दिले. भारत जगातील सर्व देशांकडे कुटुंब म्हणून पाहतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.