किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजोहान्सबर्ग, (२५ ऑगस्ट) – गुरूवारी (२४ ऑगस्ट) १५ व्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या समूहीकरणाच्या विस्ताराचे स्वागत करतो. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सहा नवीन सदस्य देशांच्या समावेशाची घोषणा केल्यानंतर आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान मोदी यांनी हे सांगितले. जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, ’मला आनंद आहे की या ३ दिवसीय बैठकीत अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ब्रिक्स सदस्यांच्या विस्ताराला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ’आमच्या संघांनी ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष, कार्यपद्धती यावर एकत्रितपणे एकमत केले याचा मला आनंद आहे.’ जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेत बोलताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत नवीन सदस्य देशांना या गटातील भागीदार म्हणून स्वीकारण्यास उत्सुक आहे. ते म्हणाले की, समूहाचा विस्तार हे बदलत्या काळाचे आणि जागतिक व्यवस्थेचे लक्षण आहे. पीएम मोदी म्हणाले, ब्रिक्सचा विस्तार आणि आधुनिकीकरण हे जगातील संस्थांना बदलत्या काळाची सवय होण्याचे संकेत आहे.
आजच्या सुरुवातीला, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सांगितले की ब्रिक्स गट सहा देशांना पूर्ण सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्यास तयार आहे. अर्जेंटिना, इथियोपिया, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती असे हे देश ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामील होतील. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणाले, ’आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांना ब्रिक्सचे पूर्ण सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी करार केला आहे. सदस्यत्व जानेवारी २०२४ पासून लागू होईल.