किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– ब्रिटनचे खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल,
लंडन, (०२ नोव्हेंबर) – कॅनडाशिवाय ब्रिटनमध्येही खलिस्तान समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याला भारताने तीव्र विरोध केल्यानंतर ब्रिटनने खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने खलिस्तानी फंडिंगवर मोठी कारवाई केली आहे. पहिल्यांदाच खलिस्तानला निधी देणारी ५० हून अधिक खाती गोठवण्यात आली आहेत. ही सर्व खाती भारतात बंदी असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलशी जोडलेली आहेत. टास्क फोर्सने खलिस्तानशी संबंधित टोपणनाव असलेल्या कथित सामाजिक सेवा संस्थांची यादीही तयार केली आहे. या संघटना खलिस्तानी समर्थकांनाही आश्रय देत असल्याचे टास्क फोर्सला आढळून आले.
टास्क फोर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांचे समर्थन करणार्या संघटनांवर लवकरच मोठी कारवाई केली जाईल. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय गुप्तचर संस्थांसोबतही माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. टास्क फोर्सने प्रथम खलिस्तानी नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या ब्रिटीश बँकांमधील खात्यांची वॉच लिस्ट तयार केली. त्यानंतर या खात्यांमध्ये परदेशातून ऑनलाइन आणि ऑफलाइन जमा केलेल्या एक लाख रुपये (सुमारे एक हजार पौंड) किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर नजर ठेवली. सुमारे दोन महिन्यांपासून या संशयास्पद खात्यांची यादी तयार करून ती गोठवण्यात आली. या खात्यांमध्ये ३० कोटींहून अधिक रक्कम रोख स्वरूपात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील टप्प्यात टास्क फोर्स अधिक कठोर कारवाई करेल.