किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकाबुल, (१० ऑक्टोबर) – अफगाणिस्तानमध्ये शनिवारी दुपारी आलेल्या भूकंपामुळे मोठी हाहाकार उडाला आहे. पश्चिम भागात झालेल्या या भूकंपात चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये ९ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय १,३०० हून अधिक घरे उद्ध्वस्त होऊन भंगारात बदलली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ एवढी होती. अधिकार्यांनी सोमवारी सांगितले की, पश्चिम अफगाणिस्तानात शनिवारी झालेल्या भूकंपात चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रवक्ते मुल्ला सैक यांनी सांगितले की, आतापर्यंत २० गावांमधील दोन हजार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामध्ये चार हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
प्रवक्त्याने सांगितले की, विविध संस्थांमधील ३५ बचाव पथकातील एकूण १,००० हून अधिक बचाव कर्मचारी बाधित भागात मदत कार्य करत आहेत. अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी हेरात प्रांतातील प्रभावित भागाला भेट देण्यासाठी अधिकार्यांच्या एका गटाचे नेतृत्व केले. चीनने रविवारी अफगाण रेड क्रिसेंटला बचाव आणि आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आपत्कालीन मानवतावादी मदत म्हणून णड२००,००० रोख दिले. यापूर्वी, आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले होते की हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातील चार गावांना भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने नोंदवले की भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर होता. यानंतर तीन जोरदार आफ्टरशॉक आले, ज्यांची तीव्रता ६.३, ५.९ आणि ५.५ होती, त्यासोबत कमी आफ्टरशॉकही आले.