किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– स्वयंचलित चौकटीअंतर्गत पाचवा संच,
नवी दिल्ली/बर्न, (१० ऑक्टोबर) – वार्षिक स्वयंचलित माहिती प्रदानअंतर्गत भारतीय नागरिकांच्या स्वीस बँक खात्यांच्या तपशीलांचा पाचवा संच स्वित्झर्लंडने भारताला दिला आहे. या स्वयंचलित माहिती अंतर्गत स्वित्झर्लंडने १०४ देशांना ३६ लाख खात्यांची माहिती दिली. भारताला देण्यात आलेले विवरण शेकडो बँक खात्यांशी संबंधित असून, त्यात काही व्यक्ती, कॉर्पोरेट्स आणि संस्थांचा समावेश आहे.
या तपशीलात नाव, पत्ता, कोणत्या देशाचा रहिवासी, कर ओळख क्रमांकासह खात्यांची ओळख आणि वित्तीय माहिती देण्यात आली. त्यात संबंधित वित्तीय संस्था, खात्यातील शिल्लक आणि भांडवली उत्पन्नाशी संबंधित माहिती आहे. तपशीलांचा हा संच मागील महिन्यात देण्यात आला. माहितीचा पुढील संच सप्टेंबर २०२४ मध्ये दिला जाईल. करदात्यांनी कर विवरण पत्रकात खरी माहिती दिली अथवा नाही, हे मिळालेल्या तपशीलांच्या आधारे कर अधिकार्यांना सत्यापित करता येईल. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथून जारी केलेल्या निवेदनात, फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) सोमवारी स्वयंचलित माहिती प्रदानअंतर्गत जागतिक मालकांनुसार १०४ देशांसोबत आर्थिक खात्याच्या माहिती देवाणघेवाण केल्याचे म्हटले.