किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– राजदूतांनी सांगितली अडचण,
जेरुसलेम, (०९ ऑक्टोबर) – शनिवारी हमासने गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर शेकडो रॉकेट्स डागली आणि युद्धाला सुरुवात झाली. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांकडून होणार्या हल्ल्यांना इस्रायलनेही सडेतोड उत्तर देत गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. मोठमोठे रॉकेट्स गाझा पट्टीत पडू लागल्यानंतर तिथे रेड सायरन जारी करण्यात आला. आतापर्यंत या युद्धात शेकडो नागरिकांचा बळी गेला असून, असंख्य इस्रायली स्त्रियांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले. अमेरिका, भारत, कॅनडा यासारख्या जगातील अनेक मोठ्या देशांनी इस्रायलला हवी ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली असली, तरी इस्रायलने मात्र आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नसल्याचे नमूद केले आहे.
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी माध्यमांशी बोलताना देशाची भूमिका स्पष्ट केली. इतर देशांकडून आपल्याला मदतीसाठी आश्वस्त करण्यात आले असले, तरी इस्रायल आपली लढाई स्वत: लढण्यासाठी सक्षम आहे, असे नाओर गिलोन यांनी सांगितले. हमासला संपवणे इस्रायलसाठी कठीण नसून, इस्रायलसमोर दुसरीच महत्त्वाची अडचण आहे. आम्ही छोटा देश असलो, तरी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. आम्ही कोणत्याही मदतीची कुणाकडून मागणी केलेली नाही. युद्धसामग्री ही आमची समस्या नाही. आमची समस्या ही आहे की, आम्ही अशा लोकांच्या विरोधात लढतोय् ज्यांना युद्धात कोणत्याही शस्त्राचा वापर करण्याची कोणतीही भीती वाटत नाही. ते महिला व लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात, ही खरी समस्या आहे, अशा शब्दांत गिलोन यांनी इस्रायलची अडचण स्पष्ट केली.
हमाससारख्या संघटनांना अद्दल घडवण्यासाठी इस्रायलकडे अमर्याद क्षमता आहेत. असे करण्यापासून आम्हाला एकच गोष्ट अडवते, पण ती हमास नाही. हमासच्या आसपास असणार्या सामान्य नागरिकांना कोणताही धक्का लागू नये, ही आमची भूमिका आहे. हमास त्यांच्या लोकांची अजिबात काळजी करीत नाही. कारण, त्यांच्यासाठी हे लोक म्हणजे इस्रायलविरोधात एक शस्त्रच आहे, असे नाओर गिलोन यांनी स्पष्ट केले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=56237