किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलबीजिंग, ४ डिसेंबर – चीनमधील सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेंशनमधील (सीडीसी) अधिकार्यांचा भ्रष्टाचार आणि पक्षपातीमुळे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने जगभरात कोरोना पसरल्याचे आढळून आले आहे. ही महामारी पहिल्याच टप्प्यात रोखण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जगभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणू संसर्गाच्या मुद्यावर चीनवर पुन्हा एकदा संशय व्यक्त होत आहे.
चीनच्या सीडीसी अधिकार्यांनी चाचणी किट वितरणाचे अधिकार देताना शांघाय येथील तीन कंपन्यांना प्राधान्य दिले. कंपन्यांबाबत अनेकांना काहीच माहिती नव्हती. शिवाय नावेही ऐकलेली नव्हती. ४० हून अधिक शास्त्रज्ञ, सीडीसी कर्मचारी, आरोग्य तज्ज्ञ आणि उद्योगक्षेत्राच्या जाणकारांसह अंतर्गत दस्ताऐवज, ई-मेल आदी विविध बाबी तपासणी केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. शांघाय येथील जीनिओडिएक्स बायोटेक, हुईरुई बायो-टेक्नोलॉजी आणि बायोजर्म मेडिकल टेक्नॉलॉजी यांनी सीडीसीला पैसे दिले होते. जवळपास १० लाख आरएमबी (एक लाख ४६ हजार ६०० डॉलर्स) इतकी मोठी रक्कम दिली असल्याची चर्चा आहे.
सीडीसी आणि राष्ट्रीय आरोग्य आयोगाने अन्य शास्त्रज्ञांना आणि संस्था, संघटनांना आपल्या चाचणी किट्सद्वारे विषाणूची चाचणी करण्यास अटकाव केला. सीडीसी आणि आरोग्य आयोगाच्या अधिकार्यांनी बाधितांच्या पुष्टीसाठी निकष आणि इतर पर्याय अधिक किचकट केले.
त्या वेळेत संसर्गाचा वेग कमी होऊ शकला असता तसेच त्यावर नियंत्रण ठेवता आले असते. त्रुटी असलेल्या तपासणी प्रणालीमुळे शास्त्रज्ञांना आणि अधिकार्यांना कोरोना किती वेगाने फैलावत आहे, याची माहिती मिळवण्यापासून अडथळे निर्माण केले असल्याचेही काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे
वुहानमध्ये पहिल्यांदा शेकडोजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. मात्र, संसर्गाबाबत माहिती देणे, गर्दी टाळणे आदी सूचना नागरिकांना देण्यात आल्या नव्हत्या. याबाबत अधिकारी बेजबाबदारीने वागल्याचा आरोप करण्यात येत आहे.