किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलन्यू यॉर्क, ३ डिसेंबर – दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी पाकिस्तानने सर्वप्रथम दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. या देशाने भारताविरोधात द्वेषाचे धोरण स्वीकारले आहे. आमच्या देशात धार्मिक कलह निर्माण करण्याची जणू मोहीमच हाती घेतली आहे, अशी माहिती भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला दिली.
बुधवारी सांस्कृतिक शांतता या विषयावरील आयोजित चर्चासत्रात येथील भारताचे स्थायी राजदूत आशिष शर्मा म्हणाले की, आजचे जग असहिष्णुता, तिरस्कार, हिंसाचार आणि दहशतवादाने भरलेले आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये दररोज शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. या कारवायामुळे केवळ जागतिक शांततेलाच नव्हे, तर धर्म आणि संस्कृतीलाही धोका निर्माण झालेला आहे.
बहुतांश देशांमधील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. निष्पाप नागरिकांचे बळी घेणे, अतिरेक्यांना आपल्या भूमीत आश्रय देणे, त्यांची पाठराखण करणे आणि त्यांना शस्त्र व निधी उपलब्ध करण्यात पाकिस्तानला कोणता आनंद मिळतो, याची माहिती नाही, पण यामुळे हा देश जगात एकाकी पडत चालला आहे.
मुस्लिम देशही पाकिस्तानला साथ द्यायला तयार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानने जर दहशतवादी कारवाया थांबविल्या आणि भारतद्वेष संपविला, तर दक्षिण आशियात सांस्कृतिक शांतता प्रस्थापित करण्याचा मार्गही मोकळा होईल आणि असंख्य निष्पाप नागरिकांना वाचविता येईल. सीमापार दहशतवाद ही भारतातील सर्वांत मोठी समस्या आहे आणि यामागे पाकिस्तानमधील राज्यकर्ते, लष्कर व गुप्तचर संस्थेचाही हात आहे. जगाला आज शांतता हवी आहे, पण नेमके शांततेतेचे महत्त्व या देशाला समजले नाही, असेही त्यांनी सांगितले.