किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमॉस्को, ३ डिसेंबर – ब्रिटनने फायजरच्या लसीला मंजुरी देत, पुढील आठवड्यापासून लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याच पृष्ठभूमीवर रशियातही पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्देश राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकार्यांना दिला आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या २० लाख मात्रांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.
रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम निष्कर्षात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. इतर लसीपेक्षा ही लस अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना लसीची मात्रा देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत २० लाख मात्रा उपलब्ध होणार आहेत. रशियात ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, लसीकरण हे ऐच्छिक करण्यात आलेले आहे.
दरम्यान, रशियाच्या थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) लसीची किंमत जाहीर केली होती. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. इतर देशांमध्ये ही लस १० डॉलर्सपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. रशियन लसीची किंमत कमी असल्यामुळे जगभरातील अधिकाधिक नागरिकांना ती परवडणारी असल्याचे रशियाने सांगितले.