किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत इशारा,
न्यू यॉर्क, (१५ फेब्रुवारी ) – जगभरातील हवामान बदलांबाबत चिंता व्यक्त करीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अनेक देशांना इशारा दिला आहे. मुंबई आणि न्यू यॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणार्या पातळीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे बदलांच्या संकटाशी सामना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे आपल्यासमोरील सर्वांत मोठे संकट आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरे, सखल भाग आणि देशांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ शकते, यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत समुद्राच्या पातळीत वाढ तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय या विषयांवर चर्चा करण्यात आली.
धोका असलेली शहरे
समुद्राची पातळी वाढण्याची सरासरी अलिकडच्या दोन दशकांमध्ये वाढली आहे. समुद्राच्या या वाढत्या पातळीमुळे जवळपास सर्वच खंडातील मोठ्या शहरांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यात कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सँटियागोसार‘या मोठ्या शहरांना यामुळे धोका आहे, असेही संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गुटेरेस म्हणाले.