किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलइस्लामाबाद, २२ डिसेंबर – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर होणार्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठविणार्या महिला कार्यकर्त्या करिमा बलूच यांचा कॅनडात संशयास्पद मृत्यू झाला. रविवारपासून त्या बेपत्ता होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या भाऊ मानत होत्या.
त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळून आला. २०१६ मध्ये बलूच स्टुडंट ऑर्गानायझेशनच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मोदी यांना भाऊ मानत एक भावूक चित्रफीत जारी केली होती. त्यांच्या हत्येमागे पाकिस्तानचा कट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
करिमा बलूच रविवारी सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना दुपारी ३ वाजता शेवटचे पाहिले गेले होते. बलूच यांनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात वाचा फोडली होती.
बलूच यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे हत्येच्या संशयाची सुई पाकिस्तान सरकार आणि गुप्तचर संघटना आयएसआयवर गेली आहे. बीबीसी वाहिनीने २०१६ मध्ये त्यांना सर्वांत प्रेरणादायी आणि प्रभावशाली अशा शंभर महिलांच्या यादीत सहभागी केले होते.
पंतप्रधान मोदींना केले होते आवाहन
त्यांनी २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांना भाऊ म्हणत, रक्षाबंधनाच्या दिवशी बलुचिस्तानमधील एका बहिणीचा आवाज ऐकण्याचे आवाहन केले होते. बलुचिस्तानमधील अनेक भाऊ बेपत्ता आहेत. पाकिस्तानी लष्कराने अनेकांची हत्या केली. येथील नरसंहार, युद्ध आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर बलूच नागरिकांचा आवाज बनण्याचे आवाहन करिमाने मोदींना केले होते.