|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.97° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 50 %

वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.58°से. - 26.11°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 27.01°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.95°से. - 27.79°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.46°से. - 28.06°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.51°से. - 27.86°से.

मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.2°से. - 26.87°से.

बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » चीनने कोरोनासंबंधी माहिती लपवून ठेवली

चीनने कोरोनासंबंधी माहिती लपवून ठेवली

न्यू यॉर्क, २१ डिसेंबर – चीनने कोरोनासाथीच्या सुरुवातीच्या काळात जगाला विषाणू संसर्गाच्या माहितीपासून दूर ठेवले वा तसे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी समाजमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले, असा आरोप न्यू यॉर्क टाईम्सने एका वृत्तातून केला आहे. या संदर्भात हॅकर्सच्या एका गटाकडे पुरावे असल्याने नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगभरात महामारी पसरल्यानंतर अनेक बातम्या दडपल्याचा आरोप चीनवर अनेकदा करण्यात आला आहे.
चीनने कोरोनासंबंधी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक बातम्या पसरवता कामा नये, अशी तंबी माध्यमांना देण्यात आली होती. अडचणीच्या आणि नकारात्मक बातम्या दडपण्याबरोबरच सोयीस्कर माहिती पेरणार्‍या बातम्या पसरवण्याचे गुप्त आदेशही देण्यात आले होते. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला योग्य वाटणारा मजकूर या काळात चिनी इंटरेनट माध्यमांवर प्रकाशित होत होता. या बातम्यांचे स्वरूप कसे असावे आदींचे निकषच अधिकार्‍यांनी घालून दिले होते, असे या वृत्तात म्हटले आहे.
न्यू यॉर्क टाईम्स आणि प्रो पब्लिका या वृत्तसंस्थांकडे अशा प्रकारच्या शेकडो आदेशांच्या प्रती उपलब्ध आहेत. एका हॅकर गटाने ही कागदपत्रे या माध्यमांना पुरवल्याची माहितीही वृत्तात देण्यात आली आहे.
कम्युनिस्ट पक्षाविरोधात मत व्यक्त करणार्‍यांच्या मागे भाडोत्री टीकाकार (ट्रोलर) लावण्यात येत. तसेच, सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा आवाज दाबून टाकला जात असे. धक्कादायक म्हणजे जानेवारी २०१९ पासूनच चीनमध्ये इंटरनेटवरील निर्बंधांना सुरुवात झाली. त्यावेळी कोरोना विषाणूविषयी ठोस माहितीही उपलब्ध नव्हती. महामारीचा फै लाव हळूहळू वाढू लागल्यानंतर अधिकार्‍यांनी इंटरनेटवर निर्बंध आणून कोरोनाच्या हाताळणीबाबत कोणतीही नकारात्मक बातमी देण्यास मनाई केली होती, असे आढळून आले आहे.
खोटे चित्र
चीनने सुरुवातीच्या काळात माहिती जगापासून दडवून ठेवल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांनी सातत्याने केला होता. चीनने मात्र त्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय सर्व काही ठीक असल्याची खोटी माहिती प्रस्तुत केली, यावर आता हॅकर्सच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, चीन आता यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतो, हे लवकरच दिसून येणार आहे.

Posted by : | on : 21 Dec 2020
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g