किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे गौरवोद्गार,
जेरुसलेम, (२५ ऑगस्ट) – भारताची यशस्वी चांद्र मोहीम ही भारत आणि जगासाठी ऐतिहासिक यश आहे, असे गौरवोद्गार काढत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. नेतान्याहू यांनी गुरुवारी मोदींशी संवाद साधला आणि चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर चांद्रयान यशस्वीपणे उतरवण्याच्या भारतीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी नमूद केले की, यशस्वी चांद्र मोहीम ही भारत आणि जगासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे आणि सर्व इस्रायली नागरिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मोदींनी इस्रायली पंतप्रधान आणि इस्रायलच्या नागरिकांना रोश हशनाह (ज्यू नवीन वर्ष) च्या आधी शुभेच्छा दिल्या आणि नजीकच्या भविष्यात इस्रायली पंतप्रधानांना भारत भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञानाच्या मुद्यांवर, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेवर सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नंतर ट्विट केले की, चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिंगबद्दल माझे प्रिय मित्र, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याकडून अभिनंदनाचा कॉल मिळाल्याने मला आनंद झाला. भारतीय लोकांच्या वतीने, मी या अभिनंदनाबद्दल त्यांचे आभार मानतो.