किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष श्रीनिवास यांची प्रतिक्रिया,
अथेन्स, (२७ ऑगस्ट) – अॅथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी २५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक‘मात नौवहन, पायाभूत सुविधा, ऊर्जा यासह विविध क्षेत्रांतील आघाडीच्या भारत आणि ग्रीस येथील मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा सहभाग होता. ग्रीसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत जेवण घेतल्यानंतर जीएमआर ग्रुपचे बिझनेस अध्यक्ष श्रीनिवास बोम्मीदला म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जे द्विपक्षीय संबंध निर्माण केले, त्याची देशातील फार कमी लोक कल्पना करू शकतील, खूप कमी लोक समजू शकतील. पंतप्रधान मोदी भारतासाठी अदृश्यपणे मोठा प्रभाव निर्माण करीत आहेत.
पंतप्रधान मोदी कुठेही जातात, ते एक सेलिब्रिटी असतात, हीरो असतात. त्यांच्या स्वागताला बरेच लोक येतात; कारण ते समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतात. ते देशातील समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारे नेते आहेत, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, औषध उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट आणि पायाभूत सुविधा यासार‘या क्षेत्रात भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात आणि भारत आणि ग्रीसमधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योजकांनी बजावलेली भूमिका त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी उद्योगपतींना भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा लाभ घेण्यासाठी आणि भारताच्या विकासगाथेचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित केले.