किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलइस्लामाबाद, (१८ डिसेंबर) – लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि या संघटनेत अतिरेकी भरती करणारा हाफीझ सईदचा महत्त्वपूर्ण साथीदार हबिबुल्लाला रविवारी सायंकाळी खैबर पख्तुनख्वातील टांक जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केल्याचे वृत्त आहे. मागील काही महिन्यांपासून अशाच पद्धतीने २० पेक्षा जास्त मोठ्या अतिरेक्यांची अज्ञातांनी हत्या केली.
आठवडाभरापूर्वी हाफीझ सईदचा निकटवर्तीय तसेच मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक अदनान अहमदला कराची येथे गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. ज्या दिवशी दाऊदवर विषप्रयोग झाल्याचे वृत्त पाकिस्तानात बाहेर आले, त्याच दिवशी हबिबुल्लाची हत्या करण्यात आली. हबिबुल्लावर तोयबामध्ये तरुणांची भरती करून प्रशिक्षण देण्याची तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारतात घुसविण्याची जबाबदारी होती.
टांक जिल्हा पुन्हा चर्चेत
खैबर पख्तुनख्वामधील टांक जिल्हा आठवडाभरात दुसऱ्यांदा चर्चेत आला. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी येथील पोलिस मुख्यालय आणि एका चौकीवर हल्ला केला होती. यात तीन पोलिस कर्मचारी ठार झाले होते, तर चकमकीत चार अतिरेकी ठार झाले. एका अतिरेक्याने चौकीच्या प्रवेशद्वारावर स्वतःला उडवून दिले होते. या हल्ल्याची जबाबदारी अन्सारूल या नवीन दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.