Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
इस्लामाबाद, (१८ डिसेंबर) – लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि या संघटनेत अतिरेकी भरती करणारा हाफीझ सईदचा महत्त्वपूर्ण साथीदार हबिबुल्लाला रविवारी सायंकाळी खैबर पख्तुनख्वातील टांक जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केल्याचे वृत्त आहे. मागील काही महिन्यांपासून अशाच पद्धतीने २० पेक्षा जास्त मोठ्या अतिरेक्यांची अज्ञातांनी हत्या केली. आठवडाभरापूर्वी हाफीझ सईदचा निकटवर्तीय तसेच मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक अदनान अहमदला कराची येथे गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. ज्या दिवशी दाऊदवर विषप्रयोग झाल्याचे वृत्त पाकिस्तानात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
इस्लामाबाद, (०४ डिसेंबर) – मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक साजिद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. डेरा गाझी खान मध्यवर्ती कारागृहात अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. साजिद मीर हा भारतासाठी मोस्ट वॉण्टेड आहे. काही महिन्यांपूर्वी साजिद मीरला लाहोर मध्यवर्ती कारागृहातून डेरा गाझी खान तुरुंगात हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बहावलपूर येथील...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
जेरुसलेम, (२१ नोव्हेंबर) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १५ वर्षे झाल्यानिमित्त इस्रायलने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. इस्रायलने निवेदनात स्पष्ट केले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षाच्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायलने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे, भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा ही एक घातक दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
इस्लामाबाद, (१० नोव्हेंबर) – भारताच्या आणखी एका शत्रू अतिरेक्याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर असलेला अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी याची खैबर पख्तूनख्वा येथे अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. अक्रम भारताविरुद्ध कायमच विष ओकायचा. त्याने २०१८ ते २०२० या काळात लष्कर-ए- तोयबाच्या भरतीचेही काम पाहिले होते. अक्रमची हत्या हा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का समजला जात आहे. पाकिस्तानातील बाजौरमध्ये गुरुवारी अक्रम...
11 Nov 2023 / No Comment / Read More »