किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलइस्लामाबाद, (०४ डिसेंबर) – मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक साजिद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. डेरा गाझी खान मध्यवर्ती कारागृहात अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. साजिद मीर हा भारतासाठी मोस्ट वॉण्टेड आहे.
काही महिन्यांपूर्वी साजिद मीरला लाहोर मध्यवर्ती कारागृहातून डेरा गाझी खान तुरुंगात हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बहावलपूर येथील रुग्णालयात दाखल केले. तो व्हेंटिलेटरवर आहे. पाकिस्तानी तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, यादरम्यान त्यांना ऑक्टोबरपासून तुरुंगाच्या स्वयंपाकघरात काम करणारा एक खाजगी स्वयंपाकी बेपत्ता असल्याचे समजले. साजिद मीर मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील एक आरोपी तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. २००८ मधील मुंबई हल्ल्यात १७० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता.
साजिदची चीनने केली होती पाठराखण
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनने साजिद मीरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत नाव टाकण्याचा प्रस्तावात आडकाठी आणली होती. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सभेत चीनने पुन्हा या प्रकरणात व्हेटोेचा वापर करीत हा प्रस्ताव रोखला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला चीनने यापूर्वी अनेकदा विरोध दर्शवला आहे.