किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
इस्लामाबाद, (१० नोव्हेंबर) – भारताच्या आणखी एका शत्रू अतिरेक्याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर असलेला अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी याची खैबर पख्तूनख्वा येथे अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. अक्रम भारताविरुद्ध कायमच विष ओकायचा. त्याने २०१८ ते २०२० या काळात लष्कर-ए- तोयबाच्या भरतीचेही काम पाहिले होते. अक्रमची हत्या हा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
पाकिस्तानातील बाजौरमध्ये गुरुवारी अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. याआधी २०१८ मध्ये भारतीय लष्कराच्या सुंजवा मिलिटरी कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या ख्वाजा शाहिदची हत्या करण्यात आली होती. पीओकेजवळ शाहिदचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. गाझी आणि शाहिदच्या आधी, लष्कर कमांडर रियाझ अहमदला सप्टेंबरमध्ये पीओकेच्या रावळकोटमधील लष्कराच्या अल कुद्दूस मशिदीबाहेर मारले होते. तो पीओकेमध्ये लष्कराच्या भरतीचे काम हाताळत होता. कासिम काश्मिरीने राजौरी आणि पूंछ भागात भरती करून खो-यात लाँचिंग कमांडर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पाकिस्तानी मीडियाने या सर्व हत्यांना इस्लामिक गुरिल्ला टार्गेट किलिंग, असे संबोधले आहे.
वरिष्ठ कमांडरची सहावी हत्या
गाझीची हत्या ही या वर्षातील लष्कराच्या पाकिस्तानमधील असलेल्या कमांडरची तिसरी हत्या आहे, तसेच सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या शीर्ष कमांडरची सहावी हत्या आहे. या वर्षी मार्चमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरची पाकिस्तानातील रावळपिंडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी फेब्रुुवारीच्या सुरुवातीला अज्ञात बंदुकधा्यांनी कराची बंदर शहरात अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची गोळ्या झाडून हत्या केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला इसिसचा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी एजाज अहमद अहंगर याला अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात तालिबानने ठार केले होते.