किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– गायिका मेरी मिलबेनने नोंदवला आक्षेप,
वॉशिंग्टन, (१० नोव्हेंबर) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्याचे पडसाद देशात उमटून त्यांचा निषेध तर होतो आहेच, पण आता त्यांनी हात जोडून माफी मागितल्यावरही कोणी त्यांना सोडायला तयार नाही. उलट नितीशकुमार यांच्यावर अश्लील वक्तव्याचा आता थेट अमेरिकेतून निषेध झाला आहे.
नितीशकुमार यांनी मुलींची साक्षरता आणि प्रजनन दर यांचा संबंध जोडून केलेल्या या विधानावर पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला. नितीशकुमार यांच्याबरोबर असलेले मित्रपक्षदेखील नाराज झाले आहेत. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही नितीशकुमार यांच्या अश्लील वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. आफ्रिकन-अमेरिकी गायिका मेरी मिलबेन हिनेही नितीशकुमार यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली.
गायिका मेरी मिलबेनने यापूर्वीही अनेकदा समाज माध्यमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला पाठिंबा दिला आहे. नितीशकुमारांच्या या विधानानंतर तिने व्हिडीओ शेअर करीत भाजपाला बिहारमध्ये नेतृत्व करण्यासाठी एका महिलेला सक्षम करण्यास सांगितले. मेरी मिलबेन म्हणाली, आज भारताला एका निर्णायक क्षणाचा सामना करावा लागत आहे. बिहारमध्ये महिलांच्या मूल्यांना आव्हान दिले जात आहे. मला विश्वास आहे की, या आव्हानाला एकच उत्तर आहे. मला वाटते की, एखाद्या धाडसी महिलेने पुढे येऊन बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली पाहिजे.
मी भारतीय असते तर बिहारमध्ये जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक लढवली असती. नितीशकुमार यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाची खरी भावना असेल, तर बिहारच्या लोकांमध्ये, भारतातील लोकांमध्ये महिलांना मत देण्याची शक्ती, मतदान करण्याची शक्ती आणि अशा काळात बदल घडवण्याची शक्ती दिली पाहिजे.