किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलमॉस्को, १५ डिसेंबर – रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस कोरोना बाधितांवर १०० टक्के प्रभावी ठरणार असल्याचे चाचणीत आढळून आले आहे.
स्पुटनिक व्ही लसीच्या चाचणीचे परिणाम, निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ही लस विकसित करणार्या गोमालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडीमियॉलजी ऍण्ड मायक्रोबायलॉजीने केलेल्या दाव्यानुसार कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली आहे. कोरोनाच्या विरुद्ध ही लस ९१.५ टक्के प्रभावी आहे. लस चाचणी डेटातून उपलब्ध माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लस चाचणीच्या पहिल्या कंट्रोल पॉईंटमध्ये लस ९२ टक्के प्रभावी आढळून आली होती. तर, दुसर्या कंट्रोल पॉईंटमध्ये ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते.
लस चाचणीची माहिती, संशोधन लवकरच वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित केले जाणार आहे. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये स्पुटनिक व्ही लसीच्या नोंदणीसाठी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित देशांमध्ये लस वापरास परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. भारतामध्ये या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. डॉ. रेडिज् लॅबोटरीजच्या माध्यमातून ही लस चाचणी घेण्यात येत आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणार्या ऍजडेनोव्हायरस या विषाणूवर आधारित आहे. या लसीची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करण्यात आली आहे. कोरोनाचा विषाणू सार्स-कोव्ह-२ मध्ये आढळणार्या रचनात्मक प्रथिनांची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
‘स्पुटनिक व्ही’ या लसीची किंमत मॉडर्ना, फायझरच्या लसीपेक्षा स्वस्त असणार आहे. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लसीची एक मात्रा १० डॉलर्सपेक्षाही (७४० रुपये) कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. फायझरची किंमत ही प्रति मात्रा १९.५० डॉलर्स (१४४६.१७ रुपये) व मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर्स (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर्स आणि ५० ते ७४ डॉलर्स इतकी लसीची किंमत असणार आहे. फायझर, मॉडर्ना व स्पुटनिक व्ही या लसींच्या दोन मात्राची आवश्यकता असणार आहे.