किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलवॉशिंग्टन, १५ डिसेंबर – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा विजय झाला आहे. इलेक्टोरल कॉलेज मतदानात बायडेन आणि हॅरिस यांना बहुमत मिळाले. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवावरही या मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे.
कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असणार आहेत. इलेक्टोरेल कॉलेजच्या मतदानामुळे सुमारे सव्वा महिन्यापासून सुरू असलेला वादही आता संपुष्टात आला आहे.
अमेरिकन राज्यघटना आणि कायद्यानुसार सोमवारी इलेक्टोरेल कॉलेजच्या मतदारांनी आपला मताधिकार पार पाडला. मतदानाची ही प्रक्रिया मतदारांनी आपापल्या राज्यांमध्ये पार पाडली. यात ५३८ मतदार सहभागी झाले होते. यात बायडेन यांना ३०६ आणि ट्रम्प यांना २३२ मते मिळाली. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता असते. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान झाले होते.
या विजयानंतर बायडेन म्हणाले की, देशात आज लोकशाहीचा विजय झाला आहे. देशात सिद्धांत दाबण्याचे, त्यांना चिरडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, अमेरिकन लोकशाहीचे सिद्धांत झुकले नाही. लोकशाही मूल्य अमेरिकन नागरिकांमध्ये जिवंत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणारे आणि निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करणारे नेते अमेरिकन नागरिकांना येत्या काही वर्षांत पाहावे लागणार नाही.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. काही राज्यांत अतिशय चुरशीची लढत झाली. मात्र, ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नव्हता.
मतमोजणीत आघाडीवर असताना आपणच विजयी झालो. त्यामुळे मतमोजणी थांबविण्यात यावी, अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. पोस्टल मतांमध्येही गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. काही राज्यांमध्ये त्यांनी न्यायालयातही धाव घेतली. मात्र, बहुतांश न्यायालयांनी त्यांची याचिका फेटाळली होती.