किमान तापमान : 23.14° से.
कमाल तापमान : 23.43° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.14° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, १७ डिसेंबर – चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली असून राजकारण, अर्थक्षेत्र आणि सुरक्षा आदी बाबींवर मोठा परिणाम झाल्याचे यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीस या संस्थेने आपल्या एका अहवालात नमूद केले आहे. भरीस चीन हा देश पाकिस्तानसारख्या देशाच्या मदतीने भारताला नुकसान पोहोचवण्याची संधी साधून आहे.
आशिया क्षेत्रातील आपले वर्चस्व दाखविण्याच्या दृष्टीने विविध कुरापती सुरू करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आला. मात्र, कोरोना महामारी काळात त्यात आणखी भर पडली. चीनचा वाढता हस्तक्षेप दक्षिण आशियातील महासागराचे क्षेत्रच नव्हे, तर हिमालयासारखा पर्वतही त्यातून सुटलेला नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. भारत-पाकिस्तान विवादात या देशाने तटस्थ भूमिका न घेता दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकिस्तानचीच बाजू घेतली आहे. यात आशिया क्षेत्रात भारताची ताकद कमी करण्याचा हेतू या विस्तारवादी देशाचा असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षात चीनने काश्मीर प्रकरणात पाकिस्तानला जोरदार समर्थन दिले होते, हे विशेष.
सदर अहवालानुसार, चीन-भारत सीमा भागातील तणाव हा पुढील काळात चर्चेचा विषय असेल. जगाला दोन्ही देशांतील अधिक स्पर्धा अनुभवास येईल.
दरम्यान, या अहवालाने चिनी भागीदारीद्वारे क्षेत्रावर पडणार्या प्रभावाचा अभ्यास करून यशस्वी धोरण बनविणे आणि अमेरिकन हित तसेच मूल्यांना पुढे नेण्यास महत्त्वाचा निर्णय घेता येणार आहे.