किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलवॉशिंग्टन, १८ डिसेंबर – जगात सर्वात तरुण पर्वतरांग समजल्या जाणार्या हिमालयाच्या सौंदर्याचे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या एका अंतराळवीराने टिपले आहे.
छायाचित्रात बर्फाच्छादित हिमालय पर्वत दिसून येतो. तसेच, भारताची राजधानी दिल्ली महानगर आणि पाकिस्तानमधील लाहोर येथील विद्युत दिवे चमकत असून, यामुळे छायाचित्राच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. याशिवाय वायुमंडळातील पार्टिकल्स (वातावरणातील धूलिकरण) आणि सोलर रेडिएशन (सौर किरणे) एकत्र आल्यामुळे एक नारंगी छटादेखील दिसून येते.
जगातील सर्वात मोठा पर्वत हिमालय हा हिंद आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेटच्या धडकेतून अर्थात प्राचीन सागरीतळावर वलीकरण प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे. हिमालयीन पर्वतरांगांच्या दक्षिण भागात भारत आणि पाकिस्तानचे कृषिक्षेत्र आहे. पर्वताच्या उत्तर भागात तिबेटचा पठारी भाग असून, त्याला जगाचे छप्पर म्हटले जाते. या मोठ्या पर्वतरांगांची लांबी सुमारे २ हजार ५०० किमी, तर रुंदी सुमारे १५० ते ४०० किमी इतकी आहे. तसेच, क्षेत्रफळ सुमारे पाच लाख चौरस किलोमीटर इतके मोजण्यात आले आहे.