किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलइस्लामाबाद, १८ डिसेंबर – रशियाच्या सहकार्याने पाकिस्तान १,१०० किमी लांब गॅस पाईपलाईन निर्मिती प्रकल्प सुरू करणार असून, या संदर्भात नुकताच एक करार अस्तित्वात आला आहे. रशियन कंपनी कराचीमधील कासिम बंदरापासून पंजाबच्या कसूरपर्यंत नैसर्गिक वायूसाठी पाईपलाईन तयार करणार आहे. यावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित प्रकल्पात पाकिस्तानचे ७४ टक्क्यांपर्यंत भागभांडवल असेल तर उर्वरित भाग रशियाचा असेल. पाकिस्तानची गॅस वितरण कंपनी सुई सदर्न गॅस कॉर्पोरेशन आणि सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाईन लिमिटेडने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. रशियन कंपनी प्रामुख्याने पाईपलाईनचे बांधकाम हाती घेईल. हा प्रकल्प दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याच्या नव्या युगाला सुरुवात करेल, अशी माहिती पंतप्रधान इम्रान खान यांचे पेट्रोलियम व्यवहारांचे सल्लागार नदीम बाबर यांनी दिली.
पाकिस्तान नैसर्गिक वायूसाठी उदयोन्मुख बाजारपेठ असली, तरी स्थानिक उत्पादनात घट झाल्याने अन्य देशांकडून नैसर्गिक वायूची आयात करावी लागत आहे. तेल आणि वायूसाठ्यांच्या शोधासाठी पाकिस्तानने २० ब्लॉकचा लिलावदेखील सुरू केला आहे. त्यासाठी पुढील महिन्यात बोली लावण्यात येणार आहे.
दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतः या प्रकल्पात रस दर्शविला होता. या करारामुळे अनेक दशकांनंतर रशियाचे पाकिस्तानमध्ये अस्तित्व असेल. मात्र, या प्रकल्पात रशियाच्या भरीव गुंतवणुकीमुळे भारताने नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही वर्षांत भारताचा विश्वासू मित्र रशियासोबत पाकिस्तानची जवळीक वाढली आहे. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान हा रशियाविरोधी गटात सामील होता. आता अमेरिकेसाठी पाकिस्तान तितका महत्त्वपूर्ण नसल्याने पाकिस्तान मागील काही काळापासून चीन आणि रशियासोबत जवळीक साधत आहे. भारतदेखील आतापर्यंत संरक्षणविषयक गरजांसाठी रशियावर अवलंबून होता. मागील काही काळात भारत इस्त्राईल आणि अमेरिकासोबत या गरजा भागवत आहे.