किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जागतिक कुस्ती स्पर्धा,
– दिव्या काकरन, सरिता मोर बाहेर,
– नेहा शर्मा कांस्यपदकासाठी झुंजणार,
बेलग्रेड, (२०सप्टेंबर) – येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी महिलांच्या ५३ किग्रॅम वजनी गटाच्या पहिल्याच लढतीत भारतीय कुस्तीपटू अंतिम पांघळने विद्यमान जागतिक विजेत्या डॉमिनिक पॅरिशवर धमाकेदार विजय नोंदविला. मात्र सरिता मोर व दिव्या काकरनसारख्या अनुभवी खेळाडूंचे आव्हान लवकरच संपुष्टात आले. दोन वेळची २० वर्षांखालील विजेती १९ वर्षीय अंतिमने पॅरिशवर ३-२ अशा गुणफरकाने विजय नोंदवित अंतिम सोळाच्या फेरीत प्रवेश मिळविला.
अमेरिकेच्या पॅरिशने प्रारंभी जोरदार आक्रमण केले, तर अंतिमनेही प्रत्युत्तरात उत्तम बचाव करण्यास सुरुवात केली. अंतिम पांघळने पॅरिशचा डावा पाय पकडला व त्याचे रूपांतर लढत बरोबरीत आणली. पॅसिव्हिटीवर अमेरिकन खेळाडूने एक गुण गमावला व अंतिमने ३-२ अशा निसटत्या आघाडीच्या बळावर विजय मिळविला. पाच भारतीय महिला कुस्तीपटू आणि १० पुरुष फ्री-स्टाईल कुस्तीपटू ऑलिम्पिक कोटा किंवा बिगर ऑलिम्पिक श्रेणींमध्ये पदक जिंकल्याशिवाय या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. विनेश फोगटने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याने अंतिम पांघळ आशियाड क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू नेहा शर्माने कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले. तिला कांस्यपदकासाठी जर्मनीच्या अनास्तासिया ब्लेव्हासशी झुंज द्यावी लागणार आहे. इतर चार कुस्तीपटू प्रभाव पाडू शकले नाहीत. बिगर ऑलिम्पिक ५५ किलो वजनी गटात भाग घेत नेहाने रेपेचेजमध्ये युक्रेनच्या मारिया व्हिनिकचा ७-४ ने पराभव करून कांस्य-पदकाच्या फेरीत प्रवेश केला.
भारतीय कुस्ती संघ युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (युडब्ल्यूडब्ल्यू) ध्वजाखाली येथे स्पर्धा करीत आहे, कारण भारतीय कुस्ती महासंघा (डब्ल्यूएफआय) च्या निवडणुका निर्धारित वेळेत न घेतल्याने युडब्ल्यूडब्ल्यूने डब्ल्यूएफआयला निलंबित केले आहे. भारतीय महिला कुस्तीपटू सरिता मोर (५७ किग्रॅ)व दिव्या काकरन (७६ किग्रॅ) या दोघींना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला, तर अंतिम कुंडू (६५ किग्रॅ) व नीलमला (५० किग्रॅ) सुद्धा अशाच प्रकारचा सामना करावा लागला. सरिताने पहिल्या फेरीत व्हेनेझुएलाच्या बेट्झाबेथ कोलमेनारेझचा ६-१ असा पराभव केल्यानंतर तिला उपउपांत्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेकडून ४-६ असा पराभव पत्करावा लागला, तर दिव्याने पात्रता फेरीत तुर्कीच्या मेहताप गुलतेकिनचा ७-५ असा पराभव केल्यानंतर तिला उपउपांत्यपूर्व सामन्यात तिला कॅनडाच्या जागतिक क‘मवारीत चौथ्या क‘मांकावर असलेल्या जस्टिना रेनेकडून पराभव पत्करावा लागला.
तथापि, अडेकुओरोये आणि जस्टिना या दोघींना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला व त्यामुळे सरिता व दिव्या काकरनला रेपचेज नियमाचा लाभ मिळाला नाही. ६५ किलो वजनीगटात अंतिम कुंडूने उपउपांत्यपूर्व सामन्यात क्रोएशियाच्या इव्हा गेरिकचा ६-० असा पराभव केला, मात्र उपांत्यपूर्व लढतीत तिला चीनच्या लिली हिने पराभूत केले. ५० किलो वजनी गटात नीलमने सुद्धा दोन झटपट विजय नोंदवीत सकारात्मक सुरुवात केली, परंतु उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या फेंग झिकीकडून पराभूत झाली.