किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-सिराजचा विकेटचा षट्कार,
-श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव,
-२६३ चेंडू शिल्लक राखून भारताचा विजय,
कोलंबो, (१७ सप्टेंबर) – आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत, ऐतिहासिक विजय मिळविला. भारतीय संघाने आठव्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आशिया कप जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ५० धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात खेळताना भारताने या धावा करत सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या श्रीलंकेचा संघ कुठेही टिकू शकला नाही आणि एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत राहिला. बुमराहने कुसल परेराला खाते न उघडता बाद केले. यानंतर सिराजने पदभार स्वीकारला आणि श्रीलंकेच्या संघाला एकही संधी दिली नाही.
सिराज दुसर्याच षटकात आला आणि त्याने ४ बळी घेतले. त्याच्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहिले. सिराजने कारकिर्दीत प्रथमच एकदिवसीय सामन्यात ६ विकेट घेतल्या. एकूण ६ विकेट्स घेण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्यानेही आपल्या खात्यात ३ बळी घेतले. श्रीलंकेचा संघ सोळाव्या षटकात ५० धावांवर बाद झाला.
प्रत्युत्तराचा डाव खेळण्यासाठी टीम इंडियाकडून ईशान किशन आणि शुभमन गिल सलामीवीर म्हणून आले. रोहित शर्माने किशनला वर पाठवले. गिल आणि इशान किशन यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघांनी सातव्या षटकात विजय मिळवला. भारताने एकदिवसीय सामन्यात २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला आणि हा सर्वात मोठा विजय आहे. गिलने २७ धावांची नाबाद खेळी तर इशान किशनने २३ धावांची नाबाद खेळी खेळली.