किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.53°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (११ जुलै) – भारतीय क्रिकेट संघाची नवीन कसोटी जर्सी समोर आली असून हि खूपच रंगीत दिसत आहे. यावर आदिदासची निळी पट्टी आधीपासून होती आणि आता जर्सीवर ड्रीम११ चा लाल लोगोही दिसतो आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे आणि त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हेडशॉट शूट दरम्यान भारतीय कसोटी संघाची नवीन जर्सी उघड झाली. ही टेस्ट जर्सी पाहून चाहते मात्र चांगलेच भडकले आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाच्या जर्सीवर पुढे भारत लिहिले होते, जे चाहत्यांना आवडले होते. आता भारताऐवजी ड्रीम११ पाहिल्यानंतर चाहते बीसीसीआयवर नाराज आहेत.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेचे हेडशॉट शूटचे फोटो समोर आले आहेत. या मालिकेसह टीम इंडिया २०२३-२५ च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपला प्रवास सुरू करेल. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, असे दिसते की ड्रीम ११ टीम वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल, टीम इंडियाविरुद्ध नाही. भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम ११ चा लोगो देखील आहे. भारतीय संघाची अशी रंगीत टेस्ट जर्सी तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. भारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे.