किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – आशियाई खेळ २०२३ च्या महिला क्रिकेट स्पर्धेत, सुवर्णपदकासाठी अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना १९ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. ही दोन्ही सुवर्णपदके सोमवारीच आली. यापूर्वी भारताने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते. महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण जिंकल्यामुळे भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ११ पदके आहेत.
भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघादरम्यान खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने २० षटकांत ७ गडी गमावून ११६ धावा केल्या. यादरम्यान भारताकडून स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी शानदार खेळी खेळली. या सामन्यात मंधानाने ४५ चेंडूत ४६ धावा केल्या. रॉड्रिग्जने शेवटच्या काही षटकांमध्ये वेगवान फलंदाजी करत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.