किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 5.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२९ सप्टेंबर) – आशियाई गेम्स २०२३ च्या ६व्या दिवशी भारताच्या मुलींनी नेमबाजीत रौप्यपदकाच्या रूपात दिवसाचे पहिले पदक जिंकले. पलक, ईशा सिंग आणि दिव्या सुब्बाराजू थाडीगोल यांनी १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यानंतर थोड्याच वेळात भारताने ५० मीटर रायफल ३झ पुरुष सांघिक स्पर्धेत १७६९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या संघात ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील सुरेश कुसळे आणि अखिल शेओरान यांचा समावेश होता. टेनिसमध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत साकेत-रामकुमार जोडीचा पराभव झाला. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पलक २४२.१ गुणांसह सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. तर ईशा सिंग २३९.७ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. महिला स्क्वॉशच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यासह भारताच्या पदकांची एकूण संख्या ३१ झाली आहे. भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि १२ कांस्य पदके जिंकली आहेत. नेमबाजीत भारताने सर्वाधिक १७ पदके जिंकली आहेत.
एकूण पदके- ३१- सुवर्ण- ८, रौप्य- ११, कांस्य- १२
रौप्य- १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धा
सुवर्ण – ५० मीटर रायफल ३झ पुरुष सांघिक स्पर्धा
रौप्य- टेनिस पुरुष दुहेरीची अंतिम फेरी
सुवर्ण- पलक (१० मीटर एअर पिस्तूल महिला अंतिम)
रौप्य- ईशा सिंग (१० मीटर एअर पिस्तूल महिला अंतिम)
कांस्य — महिला स्क्वॉश सांघिक स्पर्धा