किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भारताने रविवारी पटकावली १५ पदके,
-मराठमोळ्या अविनाशची सोनेरी कामगिरी,
हँगझोऊ, (०१ ऑक्टोबर) – येथे सुरू असलेल्या आशियाड क्रीडा स्पर्धेत रविवारी भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्णांची हॅटट्रिक साधली तसेच पदकांचे अर्धशतकही गाठले. भारतीय नेमबाजांनी स्पर्धेच्या आठव्या दिवशीसुद्धा आपली सुवर्णमय कामगिरी कायम राखली, महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आशियाडमध्ये अॅथ्लेटिक्सचे पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, तर गोळाफेकपटू तजिंदरपालसिंग तूरने आपले विजेतेपद कायम राखले. अन्य खेळाडूंनी रविवारी ७ रौप्य व ५ कांस्यपदके प्राप्त केली.
रविवारी एकाच दिवशी भारतीय पथकाने तीन सुवर्णपदकांसह एकूण १५ पदकांची कमाई करणे हा एक विक‘म ठरला आहे. आता भारताच्या खात्यात १३ सुवर्ण, २१ रौप्य व १९ कांस्यपदकांसह एकूण ५३ पदके असून, पदकतालिकेत चौथे स्थान मिळविले आहे. रविवारी पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत पृथ्वीराज तोंडाईमन, किनान चेनई व जोरावरसिंग संधूचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले, तर मनीषा कीर, प्रीती रजक आणि राजेश्वरी कुमारीचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय नेमबाजी संघाची आशियाडमधील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरीत ठरली आहे. या आशियाडमध्ये भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत एकूण २२ पदके जिंकली असून, यात ७ सुवर्ण, ९ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या गोल्फमध्ये भारतीय गोल्फर अदिती अशोकने रौप्यपदकावर नाव कोरले. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.