किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. मात्र यंदा विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार नाही. विश्वचषक स्पर्धेच्या एक दिवस आधी भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार होता. मात्र आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचे कर्णधार एकमेकांना भेटून, फोटो सेशन करतील, त्यानंतर एक लेजर शो होण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार नाही. ४ ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार होता. त्यामध्ये बॉलिवूड स्टार रणवीर सिंह, तमन्ना भाटिया, गायक अरिजीत सिंह, श्रेया घोषाल आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा कार्यक्रम होणार होता. मात्र बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
माहितीनुसार, उद्घाटन सोहळ्याऐवजी स्पर्धेचा सांगता समारोह भव्य करण्याची शक्यता आहे. १९ नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तसेच १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रक आणि स्टेडिअममध्ये काही बदल करण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत तिकिट घोटाळा झाल्याची टीका झाली. आता उद्घाटन सोहळा रद्द केल्याची माहिती आहे.
विश्वचषक स्पर्धेतला पहिला सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये होणार असून गतविजेती इंग्लंड आणि उपविजेती न्यूझीलंडची टीम आमने-सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ११ ऑक्टोबरला नेदरलँडबरोबर तर १४ ऑक्टोबरला पाकिस्तानबरोबर टीम इंडियाचा सामना होणार आहे. खउउ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्ंहेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे.