किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– शिवराज राक्षे याने मानाच्या महाराष्ट्र केसरी गदेवर आपले नाव कोरले,
धाराशिव, (२१ नोव्हेंबर) – धाराशिव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी होत नांदेडच्या शिवराज राक्षे याने मानाच्या गदेवर आपले नाव कोरले. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या सामन्यादरम्यान दीड मिनिटांचा खेळ शिल्लक असताना सदगीरला दुखापत झाली होती, तरीही त्याने लढण्याची उमेद सोडली नाही, हे या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
सायंकाळी माती व मॅटवरील कुस्त्यांची उपांत्य लढत झाली. यामध्ये मॅटवर शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. शिवराजने बाजी मारत अंतिम सामन्यात धडक मारली. माती गटामध्ये हर्षवर्धन सदगीर विरुद्ध गणेश जगताप असा सामना रंगला. त्यात सदगीर विजयी ठरला. हर्षवर्धन व शिवराज यांची मॅटवर लढत झाली. सुरुवातीपासूनच दोघांनी आक्रमक खेळ केला, पण मॅटची सवय असलेल्या शिवराजने उंचीचा फायदा घेत गुणांची कमाई केली.
हर्षवर्धन देखील तितक्याच ताकदीने लढत होता. शेवटी सामन्याला दीड मिनिटे शिल्लक असताना हर्षवर्धनच्या हाताला दुखापत झाली. तेव्हा शिवराज चार व हर्षवर्धन शून्य अशी गुणसंख्या होती. काही काळ थांबून तो पुन्हा मैदानात उतरला. वेळ कमी व दुखापतीला झुंज देत तो शिवराजला भिडत होता. पण, शिवराजनेही युक्तीचा वापर करीत वेळ घालवत विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र केसरी होण्याचा मान शिवराजने मिळवला आणि मानाच्या गदेवर नाव कोरले.