किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२० नोव्हेंबर) – भारतीय क्रिकेट संघाला रविवारी १९ नोव्हेंबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाच्या या पराभवानंतर केवळ चाहतेच नाही तर खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडही खूप उदास दिसत होते. भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या आशेने कमान हाती घेणार्या द्रविडचा करार विश्वचषकाबरोबरच संपला. आता यापुढे संघासोबत राहायचे आहे की नाही याचे उत्तर त्याने दिले. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चांगला खेळ केला. भारतीय संघाने सलग ९ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकून त्यांनी विजयी मोहीम सुरू ठेवली आणि अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले.
एकापाठोपाठ एक दमदार विजय नोंदवणार्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि विजेतेपदाचे स्वप्न भंगले. ही स्पर्धा संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा बीसीसीआयसोबतचा करारही संपुष्टात आला. २०२१ मधील टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या राहुल द्रविडने रविवारी विश्वचषकातील पराभवानंतर याबाबत चर्चा केली. जेव्हा त्याला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, बघा, मी याबद्दल अजिबात विचार केला नाही. माझे संपूर्ण लक्ष या विश्वचषकावर असल्यामुळे मला याबद्दल विचार करायला वेळ मिळाला नाही. तो पुढे म्हणाला, यावेळी ड्रेसिंग रूममधलं वातावरण खूप वेगळं आहे, प्रत्येकाच्या आतल्या भावना बाहेर येत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून हे सगळं पाहणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. मी सगळ्यांसोबत खूप वेळ घालवला आहे. त्यांना, म्हणूनच मी प्रत्येकाला वैयक्तिकरित्या खूप चांगले ओळखतो. हा खूप कठीण काळ आहे.