किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 31°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकोलकाता, (१८ नोव्हेंबर) – पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अनुभवासह युवा खेळाडूंचे मिश्रण.. यामुळे भारतीय संघाने सलग १० विजयाची नोंद केली. त्यामुळे रविवारी होणार्या महामुकाबल्यात सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान अंतिम सामना रंगणार आहे. हे दोन्ही फॉर्मात असल्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली, तर ऑस्ट्रेलियाने आफि‘केचा पराभव करत भारतापुढे आव्हान उभे केले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत भारत व दक्षिण आफि‘केने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचे खाते उघडले. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.
ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील ७ व एक उपांत्य सामना असे सलग ८ सामने जिंकले आहेत. आता फायनलमधील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. पण विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच वरचढ ठरला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत प्रत्येक संघाविरोधात वर्चस्व राखले. याला भारतही अपवाद नाही. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना आजही सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. तरीही भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खासच असतो. विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा सामना बघण्यासारखाच असतो. त्यामुळे सर्व चाहत्यांची याकडे नजरा खिळलेल्या असतात. विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे आकडेवारीवरुन दिसते, पण भारतानेही कडवी टक्कर दिली आहे.
या दोन संघांची विश्वचषकातील आकडेवारी लक्षणीय आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ वेळा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात विजय मिळवला. भारताला पाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत एकही सामना बरोबरीत सुटला नाही अथवा रद्द झाला नाही. विश्वचषकात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसं‘या ३५९ इतकी आहे. भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वोच्च धावसं‘या ३५२ इतकी आहे. विश्वचषकात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची निचांकी धावंस‘या १२८ इतकी आहे. विश्वचषकात भारताची ऑस्ट्रेलियाविरोधातील निचांकी धावसं‘या १२५ इतकी आहे. विश्वचषकात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला सामना १३ जून १९८३ रोजी झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी विजय मिळवला होता. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील अखेरचा सामना ८ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला होता. त्यामध्ये भारताने सहा गड्यांनी विजय मिळवला. भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय १९८३ मध्ये झाला होता. १६२ धावांनी भारताचा पराभव केला होता. भारताचा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा विजय १९८३ च्या विश्वचषकात झाला होता. भारताने ११८ धावांनी हा सामना जिंकला होता.