किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– ३५ व्या वाढदिवशी ठोकले ४९ वे शतक,
कोलकाता, (०५ नोव्हेंबर) – भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने आपल्या ३५ व्या वाढदिवशी वन-डे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने वन-डेमध्ये ४९ शतके ठोकली होती. आता या विक‘माची कोहलीने रविवारी बरोबरी केली आहे. कोहलीचे हे यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक ठरले.
कोहलीने अवघ्या २७७ डावात ४९ वे वन-डे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला ४९ वन-डे शतकांसाठी ४५२ डाव लागले होते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एके काळी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फलंदाजाच्या नावावर अनेक मोठे विक्र‘मही नोंदवले गेले आहेत, पण भारतीय संघाचा विद्यमान स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा वन-डेतील शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर ईडन गार्डन स्टेडियममध्ये एकच जल्लोेष पाहायला मिळाला. बंगाल कि‘केट संघटनेने ठरविल्यानंतर कोहलीच्या वाढदिवसानिमित्त केक कापला.
कोहलीचे झंझावाती शतक –
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला व मैदानावर वर्चस्व गाजवले. कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीने ११९ चेंडूंत शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकांत कोहलीने संयमी फलंदाजी केली. त्याने चांगल्या चेंडूला मान देत एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत १० चौकार खेचलेत.
सचिनची कारकीर्द
सचिनने आपल्या वन-डे कारकिर्दीत ४६३ सामने खेळले. या कालावधीत ४५२ डावात १८,४२६ धावा झाल्या. त्याची सरासरी ४४.८३ होती. सचिनने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याने १९५ षटकार आणि २०१६ चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये ४१ वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०० धावा इतकी आहे.
अव्वल पाचमध्ये तीन भारतीय
तेंडुलकर व कोहलीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा एकदिवसीय कि‘केटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणार्यांपैकी एक आहे. रोहितने २५९ सामन्यात ३१ शतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग आहे. पॉण्टिंगने ३७५ सामन्यांमध्ये ३० शतके झळकावली आहेत. या दोघांनंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या पाचव्या स्थानावर आहे. त्याने ४४५ सामन्यांमध्ये २८ शतके झळकावली आहेत.
सचिनकडून अभिनंदन
सचिनच्या वन-डे शतकांची बरोबरी केल्यानंतर कोहलीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे अभिनंदन केले. भारतीय क्रिकेट नियामक मंळासह (बीसीसीआय) जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीचे अभिनंदन केले.
रोहित-शुभमनने केला हा विक्रम
– रबाडा रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज
ईडन गार्डन्सवर भारत व दक्षिण आफ्रिकादरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील ३७ व्या वन-डे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने भारताच्या डावाची झंझावाती सुरुवात केली. दोघांनी ३५ चेंडूत ६२ धावांची सलामी भागीदारी केली. या भागीदाहीसह रोहित व शुभमनने भारतासाठी एक खास विक्रम केला.
एका वर्षातील सर्वोच्च ओपनिंग धावा
या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आतापर्यंत भारताने वन-डेमध्ये पहिल्या गड्यासाठी २०१९ धावा केल्या आहेत. रोहित-शुभमनच्या योगदानाशिवाय ईशान किशनसह इतर फलंदाजांनीही यात मोलाचे योगदान दिले आहे. एका वर्षात भारताने सलामीच्या गड्यासाठी केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये भारताने वन-डे सामन्यात पहिल्या गड्यासाठी २००२ धावा केल्या होत्या, तर २००२ मध्ये १७०२ धावा झाल्या होत्या.
दुसर्या सर्वात वेगवान ५० धावा
रोहित-शुभमनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती सुरुवात केली. भारताने अवघ्या ४.३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या होत्या. या विश्वचषकात कोणत्याही संघाने सर्वात जलद ५० धावा पूर्ण करण्याचा हा दुसरा विक्रम आहे. धर्मशाळा येथे न्यूझीलंडविरुद्ध ४.१ षटकात ५० धावा पूर्ण करणार्या भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया पुढे आहे. रोहितने २४ चेंडूत ४० धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षट्कार मारले. त्याला कॅगिसो रबाडाने टेम्बा बावुमाच्या हाती झेलबाद केले.
रबाडाने हिटमनला बाद करून विक्रम केला
यासह रबाडा आंतरराष्ट्रीय कि‘केटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅट एकत्र करून १२ वेळा रोहितला बाद केले आहे. टिम साऊदी ११ वेळा दुसर्या स्थानावर आहे. तर अँजेलो मॅथ्यूज १० वेळेसह तिसर्या स्थानावर आहे. नॅथन लियोनने रोहितला नऊ वेळा तर ट्रेंट बोल्टने रोहितला आठ वेळा बाद केले आहे.
पहिल्या पॉवरप्लेमध्ये मार्को जानसेनला एकही बळी मिळाला नाही
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिल्या १० षटकांमध्ये एकही बळी घेऊ शकला नाही. मार्कोला पहिल्या १० षटकांत एकही बळी घेता आली नसल्याची या विश्वचषकात ही पहिलीच वेळ आहे. मार्को जानसेनने या विश्वचषकात आतापर्यंत सात सामन्यांत १६ बळी घेतले आहेत.