किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषक,
– दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी धुव्वा,
कोलकाता, (०५ नोव्हेंबर) – बर्थ-डे बॉय विराट कोहलीचे विक्रमी शतक (१०१) , श्रेयस अय्यरचे अर्धशतक (७७) तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (३३ धावांत ५ बळी) प्रभावी फिरकीच्या बळावर भारताने ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयसीसी वन-डे विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा२४३ धावांनी पराभव केला. शतकवीर विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताने उभारलेल्या ५ बाद ३२६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत अवघ्या ८३ धावांतच गारद झाला. आफ्रिकन संघाला झटपट गुंडाळताना जडेजाने ५ बळी, मोहम्मद शमी व कुलदीप यादवने प्रत्येकी २ बळी व मोहम्मद सिराजने एक बळी टिपला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व त्याने शुभमन गिलच्या साथीने ६२ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या डावाची झकास सुरुवात केली. रोहितचा रबाडाच्या चेंडूवर उडालेला झेल मिडऑफवर आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने पकडला. रोहितने २४ चेंडूंत ६ चौकार व २ षट्कारांसह ४० धावा काढल्या. संघाच्या ९३ झाल्या असताना शुभमन गिल (२३) डावखुरा केशव महाराजच्या फिरकीला बळी पडला. मात्र त्यानंतर विराट कोहली व श्रेयस अय्यरने संयमाने फलंदाजी करत भारताच्या धावसं‘येला आकार दिला. दोघेही वैयक्तिक शतकाकडे करीत असतानाच श्रेयसला नगिदीने तंबूत परत पाठविले.
श्रेयसने ८७ चेंडूंत ७ चौकार व २ षट्कारांसह ७७ धावांची खेळी केली व कोहलीसोबत तिसर्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी केली. पुढे कोहलीला केएल राहुल (८) व सूर्यकुमार यादवची (२२) फारशी साथ मिळाली नाही. रवींद्र जडेजाच्या साथीने अपेक्षेनुरुप विराट कोहलीने आपले ४९ वे शतक साजरे केले व भारताला मर्यादित ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा उभारून दिल्या. कोहलीने १२१ चेंडूंचा सामना करत १० चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांची शतकी खेळी केली, तर जडेजाने अवघ्या १५ चेंडूंत नाबाद २९ धावांची भर घातली. यात त्याने ३ चौकार व एक षट्कार हाणला. दक्षिण आफि‘केकडून पाच गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळविले.
विजयासाठी ३२७ धावा काढण्याचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. त्यांचा निम्मा संघ १३.१ षटकांत अवघ्या ४० धावांतच बाद झाला. क्विंटन डिकॉक व टेम्बा बावुमा या सलामी जोडीसह रॅसी व्हॅन डर दुसेन, एडन मार्कराम व हेनरिक क्लासेन मोहम्मद सिराज, मोहम्मद शमीच्या वेगवान मार्यासमोर तसेच डावखुरा जडेजाच्या फिरकीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. पुढे रवींद्र जडेजा व कुलदीप यादवने आपल्या प्रभावी फिरकीने उर्वरित फलंदाजांना बाद करत आफ्रिकन संघाला ८३ धावांत गुंडाळले.
धावफलक
भारत : ५० षटकांत ५ बाद ३२६.
रोहित शर्मा झे. बावुमा गो. रबाडा ४०, शुभमन गिल त्रि. गो. महाराज २३, विराट कोहली नाबाद १०१, श्रेयस अय्यर झे. मार्कराम गो. नगिदी ७७, केएल राहुल झे. व्हॅन डर दुसेन गो. जानसेन ०८, सूर्यकुमार यादव झे. डिकॉक गो. शम्सी २२, रवींद्र जडेजा नाबाद २९, अवांतर २६.
गडी बाद क्रम : १-६२, २-९३, ३-२२७, ४-२४९, ५-२८५.
गोलंदाजी : लुंगी नगिदी ८.२-०-६३-१, मार्को जानसेन ९.४-०-९४-१, कॅगिसो रबाडा १०-१-४८-१, केशव महाराज १०-०-३०-१, तबरेज शम्सी १०-०-७२-१, एडन मार्कराम २-०-१७-०.
दक्षिण आफ्रिका : २७.१ षटकांत सर्वबाद ८३.
क्विंटन डिकॉक त्रि. गो. मोहम्मद सिराज ०५, टेम्बा बावुमा त्रि. गो. जडेजा ११, रॅसी व्हॅन डर दुसेन पायचित गो. मोहम्मद शमी १३, एडन मार्कराम झे. राहुल गो. मोहम्मद शमी ०९, हेनरिक क्लासेन पायचित गो. जडेजा ०१, डेव्हिड मिलर त्रि. गो. जडेजा ११, मार्को जानसेन झे. जडेजा गो. कुलदीप यादव १४, केशव महाराज त्रि. गो. जडेजा ०७, कॅगिसो रबाडा झे. व गो. जडेजा ०६, लुंगी नगिदी त्रि. गो. कुलदीप यादव ००, तबरेज शम्सी नाबाद ०४, अवांतर ०२.
गडी बाद क्रम : १-६, २-२२, ३-३५, ४-४०, ५-४०, ६-५९, ७-६७, ८-७९, ९-७९, १०-८३.
गोलंदाजी : जसप्रीत बुमराह ५-०-१४-०, मोहम्मद सिराज ४-१-११-१, रवींद्र जडेजा ९-१-३३-५, मोहम्मद शमी ४-०-१८-२, कुलदीप यादव ५.१-१-७-२.
आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषक गुणतालिका
संघ सामने विजय पराभव गुण नेट-रनरेट
भारत ८ ८ ० १६ २.४५६
दक्षिण आफ्रिका ८ ६ २ १२ १.३७६
ऑस्ट्रेलिया ७ ५ २ १० ०.९२४
न्यूझीलंड ८ ४ ४ ८ ०.३९८
पाकिस्तान ८ ४ ४ ८ ०.०३६
अफगाणिस्तान ७ ४ ३ ८ -०.३३०
श्रीलंका ७ २ ५ ४ -१.१६२
नेदरलॅण्ड ७ २ ५ ४ -१.३९८
बांगलादेश ७ १ ६ २ -१.४४६
इंग्लंड ७ १ ६ २ -१.५०४