किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनात भारताला पहिले पदक; देशभरात आनंद,
टोकियो, २४ जुलै – २१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मीराबाई चानूने भारताला भारोत्तोलनात टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. मीराबाईने आपल्या शक्तीचा उत्तम वापर करीत देशाला रौप्यपदक मिळवून दिले. या पदकासोबतच भारताने ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत खाते उघडले असून, भारत दुसर्या क्रमांकावर आहे.
मीराबाईच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मीराबाईचे अभिनंदन केले आहे.
मीराबाई चानूने महिलांच्या ४९ किलो ग्रॅम वजन गटात एकूण २०२ किलो (८७+११५ किलोग्रॅम) वजन उचलून रौप्यपदकावर नाव कोरले. कर्नाम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनात ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली. यापूर्वी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरीने कांस्यपदक प्राप्त केले होते.
मीराबाईने मिळविलेले यश अतुलनीय आहे. तिच्या या पदकामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी इतरांना प्रेरणा मिळणार आहे. ही केवळ सुरुवात आहे. भारत आणखी पदकांची कमाई करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. चीनच्या हाऊ झिहुई हिने एकूण २१० किलोग्रॅम (९४+११६ किलो) वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. तिने ऑलिम्पिकमध्ये विक्रम केला. इंडोनेशियाची अयसाह विंडी कांटिकाने एकूण १९४ किलो (८४+११० किलोग्रॅम) वजन उचलून कांस्यपदक प्राप्त केले.