|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.48° से.

कमाल तापमान : 29.49° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.49° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.57°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.15°से. - 29.76°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.65°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 31.17°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.59°से. - 30.7°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.71°से. - 30.37°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » क्रीडा » महिला स्पर्धकांमुळे वाढल्या पदकाच्या अपेक्षा

महिला स्पर्धकांमुळे वाढल्या पदकाच्या अपेक्षा

टोकियो, २५ जुलै – टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला भारत्तोलक मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आणि देशाला पहिले पदक जिंकून दिले. मीराबाईच्या या स्पृहणीय यशामुळे देशात आनंदाची लाट आलीच शिवाय टोकियोतील इतर भारतीय खेळाडूंना विशेषतः महिला खेळाडूंना स्फूरण चढले व त्यांनी भारतीय स्त्रीशक्तीचे शानदार प्रदर्शन करीत विजय नोंदविला. रविवारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बॉक्सर एमसी मेरी कोम आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्राने भारताला आणखी पदक जिंकून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
२०१२ लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेती मेरी कोमने टोकियोत रविवारी पहिल्या फेरीत हर्नांडिज गार्सियावर मात करून पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. २०१६ रिओ ऑलिम्पिकचे रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इस्त्रायलच्या केसनिया पॉलिकॉर्पोव्हावर विजय मिळविला.
महिला टेबल टेनिस एकेरीत मनिका बत्राने विजयी घोडदौड कायम राखीत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. मनिकाने ३२ व्या विश्‍वमानांकित युक्रेनच्या मार्गारिटा पेसोस्काला ४-३ ने पराभवाचा हादरा दिला. टोकियोत आज पिस्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे युवा नेमबाज मनू भाकेर अंतिम फेरी गाठू शकली नाही.
एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला खेळाडू स्पर्धा गाजवित असतानाच, बुडापेस्ट हंगेरी येथे आयोजित जागतिक ज्युनियर कॅडेट गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले. ७५ किग्रॅ्र वजन गटाच्या अंतिम सामन्यात प्रियाने बेलारूसच्या केसेनिया पतापोविचला धूळ चारली.

Posted by : | on : 26 Jul 2021
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g