|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.57° C

कमाल तापमान : 37.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 34 %

वायू वेग : 8.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

37.99° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.91°C - 37.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.93°C - 31.6°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.36°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.29°C - 30.43°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.11°C - 31.24°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 06 May

28.24°C - 31.25°C

sky is clear
Home » क्रीडा » सिंधूसह तिघांनी कायम ठेवली पदकांची आशा

सिंधूसह तिघांनी कायम ठेवली पदकांची आशा

टोकियो, २९ जुलै – विश्‍वविजेती पी. व्ही. सिंधूने आपली विजयी घोडदौड कायम राखत भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याची आशा पल्लवित ठेवली आहे. मात्र, सहा वेळची विश्‍वविजेती बॉक्सर मेरी कोमचे उप-उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले. भारतीय पुरुष हॉकी संघ व तिरंदाज अतनू दास व बॉक्सर सतीश कुमारने गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश करून भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा कायम राखल्या आहेत.
गुरुवारी सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डटवर २१-१५, २१-१३ असा सरळ विजय नोंदविला. भारतीय तिरंदाज अतनू दासनेही आपली पत्नी दीपिका कुमारीसह वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यासोबतच भारतीय पुरुष संघानेही विद्यमान विजेत्या अर्जंेटिनाला ३-१ अशी मात देत ४० वर्षांनंतर देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याच्या आशा निर्माण केल्या आहेत. लवलिना बोर्गोहेन व पूजा राणीच्या रूपाने भारताला पदक मिळण्याची आशा आहे. पुरुष बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारनेही पुरुषांच्या सुपर हेवीवेट वजनगटात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनवर ४-१ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
तिकडे भारताची युवा नेमबाज मनू भाकेर व राही सरनोबतनेही महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रीसिजन पात्रता फेरीत अनुक्रमे पाचवे व २५ वे स्थान मिळून आशा कायम राखल्या आहेत.

Posted by : | on : 30 Jul 2021
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g