किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलटोकियो, १ ऑगस्ट – मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव करीत ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या कामगिरीमुळे ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा वाढली आहे.
भारताकडून दिलप्रीतसिंग (७ व्या मिनिटाला), गुरजंतसिंग (१६ व्या) व हार्दिकसिंहने (५७ व्या) तीन मैदानी गोल नोंदवून आठ वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ग्रेट ब्रिटनकडून एकमेव गोल सॅम वार्डने ४५ व्या मिनिटाला केला.
भारताने १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे आठवे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले असले, तरी त्यावेळी उपात्य फेरी नव्हती. स्पर्धेत केवळ आठ संघ सहभागी झाले होते. १९७२ सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती, मात्र या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून ०-२ ने पराभव पत्करावा लागला होता.
आता मंगळवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना विश्वविजेता बेल्जियमशी होईल. बेल्जियमने दुसर्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा ३-१ असा पराभव करीत अंतिम चार फेरीत आपले स्थान पक्के केले. पुरुष हॉकी स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यात खेळला जाणार आहे.