किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलसलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकण्याचा रचला इतिहास,
टोकियो, १ ऑगस्ट – भारताच्या पी. व्ही. सिंधूने रविवारी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. रविवारी कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. सिंधूचे हे सलग दुसरे ऑलिम्पिकपदक ठरले. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक पटकावले होते.
हैदराबादची २६ वर्षीय पी. व्ही. सिंधू दोन ऑलिम्पिक पदके पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली असून कुस्तीपटू सुशील कुमारनंतर दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय ऑलिम्पिकपटू ठरली आहे.
सध्या सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलक मीराबाई चानूने भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकून दिल्यानंतर सिंधूने भारतासाठी दुसरे पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या ४९ किग्र्रॅ वजनगटातील भारोत्तोलानात मीराबाईने रौप्यपदक जिंकले.
बॉक्सर लवलिना बोर्गोहेननेही उपांत्य फेरी गाठून भारतासाठी तिसरे पदक निश्चित केलेले आहे.
सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखविला व बिंग जियाओ दबावाखाली असल्याचे दिसून आले. पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंग जियाओला संधी दिली नाही व आघाडी कायम ठेवली. पहिला गेम २१-१३ न जिंकला. दुसर्या गेममध्येसुद्धा सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली व हा गेमसुद्धा २१-१५ ने जिंकून कांस्यपदक मिळविले. सिंधूशिवाय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सुवर्णपदकासाठी चीन तायपेईच्या तई त्झु यिंग आणि चेन युफेई यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे.
सिंधू भारताचा अभिमान ः मोदी
नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून तिचे अभिनंदन केले.
पी. व्ही. सिंधू भारताचा अभिमान आहे. ती आमच्या सर्वोत्तम ऑलिम्पिकपटूंपैकी एक आहे. सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपण सर्वजण आनंदी आहोत. ती भारताची शान आहे. टोकियो ऑलिम्पिक- २०२० मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.विश्वविजेती सिंधू ही दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी देशाची दुसरी व पहिली महिला खेळाडू ठरली आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदक मिळविले होते. कुस्तीपटू सुशील कुमार दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय आहे. त्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू व अन्य मान्यवरांनी सिंधूचे अभिनंदन केले आहे.