किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलबलाढ्य ऑस्ट्रेलियाला केले पराभूत,
टोकियो, २ ऑगस्ट –
विजयाचा दृढनिश्चय करून मैदानात उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी येथे इतिहास रचला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तीन वेळा विजेत्या आणि जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत करण्यात भारताला अभूतपूर्व यश आले.
पुरुषांचा हॉकी संघही ४९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या अंतराने महिला हॉकी संघानेही इतिहास रचत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यात यश मिळविले. जगात ९व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघानेही अभूतपूर्व यश मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रूपांतरित करण्यात २२ व्या मिनिटाला गुरजित कौरला यश आले आणि ऑस्ट्रेलिया संघाला धक्का बसला. परंतु संपूर्ण सामन्यात भारतासमोर एक मोठे आव्हान उभे होते. हे मोठे आव्हान पेलत भारताने इतिहास रचला.