किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.69°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादललवलिना बोर्गोहेनला कांस्यपदक,
टोकियो, ४ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करीत भारताच्या पदकाच्या आशा कायम राखल्या आहे. लवलिना बोर्गेहेनने मुष्टियुद्धात कांस्यपदक मिळविले, तर भारतीय महिला संघाचे ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंग झाले असले, तरी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. तसेच कुस्तीपटू रवी दहियाने अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे, तर दीपक पुनियाला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ऍथ्लेटिक्समध्ये नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम फेक करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
आसामची २३ वर्षीय लवलिना बोर्गोहेन ही ऑलिम्पिकचे पदक मिळविणारी भारताची तिसरी बॉक्सर ठरली आहे. यापूर्वी विजेंदरसिंह (२००८) व एम. सी. मेरी कोम (२०१२) यांनी ऑलिम्पिकपदक मिळविले आहे.
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एक रौप्य व २ कांस्यपदकांची कमाई केली असून, पदकतालिकेत भारत ६३ व्या क्रमांकावर आहे. पदकतालिकेत चीन ३२ सुवर्ण, २१ रौप्य व १६ कांस्यपदकांसह अव्वल स्थानावर, तर अमेरिका २५ सुवर्ण, ३० रौप्य व २२ कांस्यपदकांसह दुसर्या स्थानावर आहे.