किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल४१ वर्षांनंतर आला ऐतिहासिक क्षण, जर्मनीचा ५-४ ने पराभव,
टोकियो, ५ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने जर्मनीवर ५-४ विजय नोंदवून कांस्यपदक पटकावले. त्यांनी केवळ कांस्यपदकच पटकावले नाही, तर देशवासीयांचे मनही जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा हा ऐतिहासिक क्षण तब्बल ४१ वर्षांनंतर आला.
कांस्यपदकासाठी झालेल्या या चुरशीच्या सामन्यात सिमरनजीतसिंग, हार्दिकसिंग, हरमनप्रीतसिंग व रूपिंदर पाल सिंगने शानदार गोल नोंदविले व ते भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयाबरोबर भारतीयांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले.
भारतीय हॉकी संघाच्या यशस्वी कामगिरीचा जल्लोष देशभरात करण्यात आला. याशिवाय पाकिस्तानमध्येही भारताने जिंकलेल्या कांस्यपदकावर जोरदार चर्चा झाली.
पंजाबच्या प्रत्येक हॉकीपटूला १ कोटी
कांस्यपदक जिंकणार्या भारतीय पुरुष हॉकी संघातील पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. भारतीय हॉकी संघाचे प्रायोजक ओडिशा सरकार व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत संघाचे अभिनंदन केले.
८ सुवर्ण, १ रौप्य, ३ कांस्य
भारतीय पुरुष हॉकी संघाने २९ जुलै १९८० साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे ते अखेरचे आठवे सुवर्ण पदक ठरले होते. याशिवाय भारताने १ रौप्य व ३ कांस्य पदक जिंकले. याआधीच्या नऊ ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही पदक जिंकता आले नव्हते. त्यानंतर आज गुरुवार ५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची किमया केली. या पदकामुळे भारतीय हॉकीला गतवैभव प्राप्त झाले.
कांस्यपदकाच्या ऑलिम्पिक सामन्यात भारत अजेय
१९६८
पश्चिम जर्मनीवर
२-१ ने मात
१९७२
नेदरलॅण्डवर
२-१ ने मात
२०२१
जर्मनीवर
५-४ ने मात
१९८० नंतरची भारताची कामगिरी
१९८४
पाचवे स्थान
१९८८
सहावे स्थान
१९९२
सातवे स्थान
१९९६
आठवे स्थान
२०००
सातवे स्थान
२००४
सातवे स्थान
२००८
अपात्र
२०१२
बारावे स्थान
२०१६
आठवे स्थान
२०२०
तिसरे स्थान