किमान तापमान : 23.56° से.
कमाल तापमान : 24.71° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 2.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.56° से.
22.64°से. - 25.21°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादलटोकियो, ५ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी पुरुषांच्या ५७ कि. ग्रॅ. वजनगटाच्या फ्री-स्टाईल कुस्तीच्या अंतिम सामन्यात भारताचा २३ वर्षीय रवीकुमार दहियाला रूपेरी यश मिळाले आहे. रशियाच्या दोन वेळच्या विजेता झव्हूर उगेव्हने त्याच्यावर ४-७ अशा गुणांनी विजय मिळवला.
रवीकुमार ऑलिम्पिक रौप्य जिंकणारा सुशीलकुमारनंतरचा (२०१२ लंडन ऑलिम्पिक) दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे रौप्य व एकूण पाचवे पदक आहे.
रवी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा चौथा भारतीय पुरुष कुस्तीपटू आणि एकूण पाचवा कुस्तीपटू आहे. सर्वप्रथम खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्यानंतर सुशीलकुमारने २००८ बीजिंग व २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य जिंकले. योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. त्यानंतर साक्षी मलिकने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. साक्षी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.