किमान तापमान : 25.21° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 7.34 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
22.32°से. - 28.99°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.33°से. - 27.06°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.24°से. - 26.05°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.97°से. - 25.3°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.77°से. - 26.12°से.
शुक्रवार, 17 जानेवारी कुछ बादल24.73°से. - 26.94°से.
शनिवार, 18 जानेवारी घनघोर बादलकेंद्र सरकारने केले नवीन नामकरण,
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट – क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार यापुढे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार आहे. आतापर्यंत हा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जात होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. देशाला अभिमानास्पद ठरणार्या अनेक घटना घडत असताना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात यावे, असा आग्रह देशवासीयांकडून पुढे आला. लोकांच्या भावनांचा आदर करीत, या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले.
मेजर ध्यानचंद यांचा समावेश देशातील मान्यवर खेळांडूमध्ये होतो, त्यांनी देशाला गौरवाचे आणि सन्मानाचे स्थान मिळवून दिले, त्यामुळे देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणे हे औचित्याला धरून आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. हॉकीचे जादुगार म्हणून ते ओळखले जात.
आता स्टेडियमचीही नावे बदलवा : कॉंगे्रस
खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. केंद्र सरकारने आता नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदलवून त्यांना सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांची नावे द्यावीत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.