किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 29.64° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.64° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशडॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांचे प्रतिपादन,
नागपूर, ६ ऑगस्ट –
तालिबान-पाकिस्तान-चीन या त्रिकुटापासून भारताला धोका आहे. त्यांच्या युतीकडे आणि कारवायांकडे आपले लक्ष असले पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका घेण्याची आपली तयारी असली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री, भाजपा नेते आणि विचारवंत डॉ. सुब्रमण्यन स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. स्वामी आज नागपूर दौर्यावर आले असता, त्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तालिबान्यांच्या वाढत्या प्रभावाच्या पृष्ठभूमीवर अफगाणिस्तानबाबत युनोमध्ये आपल्याला निश्चित भूमिका घेण्याची संधी आहे, असे डॉ. स्वामी यांनी म्हटले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, अफगाणिस्तान आपल्या जवळचा आहे. तालिबानचा हस्तक्षेप वाढला आहे. तालिबानला पाकिस्तानचा वरदहस्त आहे. सोबत चीन आहे. तालिबान, पाकिस्तान आणि चीन हे त्रिकूट भारतासाठी धोक्याचे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणसंदर्भात आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. या सर्व वादात अमेरिका भारतासोबत राहील का? या प्रश्नावर, अमेरिका यात मुळीच रस घेणार नाही. रशियाही चीनचा साथीदार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे डॉ. स्वामी म्हणाले.
बुद्धिवंतांनी वादाला घाबरू नये
डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी नेहमी वादग्रस्त विधाने का करतात, त्यांना वाद आवडतो काय, असे विचारले असता, बुद्धिजीवींनी वादाला कधीही घाबरू नये, अशी टिप्पणी त्यांनी केली. मी नेहमी जे मुद्दे उपस्थित करतो, त्याचे पुरावे माझ्याकडे असतात. नीट माहिती घेतो आणि मग बोलतो. काही काळानंतर तेच मुद्दे खरे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मी माझ्यावरील टीका ही आपली प्रशंसा आहे असे मानतो, अशी मिश्किलीही त्यांनी केली.