किमान तापमान : 28.14° से.
कमाल तापमान : 28.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.14° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात,
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – देशाची सर्वच क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल होत असताना विरोधी पक्षांनी स्वार्थासाठी संसदेचे कामकाज बंद पाडून स्वत:चीच नाचक्की करून घेतली आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केली. पेगासस स्पायवेअर वाद आणि इतर मुद्यांवरून संसदेचे कामकाज ठप्प केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली.
एकीकडे, आपला देश विजयी गोल करीत आहे, तर दुसरीकडे, काही लोक राजकीय स्वार्थामुळे अशा काही गोष्टी करीत आहेत की ज्यामुळे असे वाटते की ते ‘सेल्फ गोल’ करीत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर प्रहार केला. केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेच्या उत्तरप्रदेशातील लाभार्थ्यांशी आभासी माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिनानिमित्त उत्तरप्रदेश सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
देशाला काय हवे आहे, काय साध्य करत आहे किंवा कसा बदलत आहे याची विरोधकांना चिंता नाही. राजकीय स्वार्थामुळे देशाचा आत्मा आणि वेळ दोन्हींचे ते नुकसान करीत आहेत. ते स्वत:च्या स्वार्थासाठी भारताच्या संसदेचा सतत अपमान करत आहेत, असे मोदी म्हणाले.
विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले, या देशातील महान लोकांना असे स्वार्थी राजकारणी वेठीस धरू शकत नाहीत. या लोकांनी देशाचा विकास रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा देश थांबणार नाही. ते संसदेचे कामकाज रोखण्यात गुंतले आहेत पण १३० कोटी लोक देशाची प्रगतीची वाटचाल थांबू नयेत यामध्ये गुंतले आहेत. विकासाच्या मार्गावर अडथळे निर्माण करणे हा विरोधी पक्षांचा एकमेव हेतू आहे. ही त्यांची कृती देशविरोधी असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, भारत पुढे वाटचाल करीत आहे. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या सरकारच्या उपलब्धींची तपशीलवार यादीच सांगितली.
१९ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. पुढील आठवड्यात सत्र संपण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचे नाव न घेता त्यांच्यावर उत्तरप्रदेशचा वापर आपल्या कौटुंबिक आणि राजकीय स्वार्थासाठी केल्याचा आरोप केला.
हे राज्य भारताच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेले नव्हते. काही कुटुंबांनी प्रगती केली. या लोकांनी उत्तरप्रदेशाला नाही तर स्वत:ला समृद्ध केले. मला आनंद आहे की आज उत्तर प्रदेश अशा लोकांचे दुष्ट वर्तुळ तोडून पुढे जात आहे. दिल्लीच्या सिंहासनाचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो आणि देशाच्या समृद्धीचा मार्ग देखील उत्तरप्रदेशातूनच जातो. मात्र, ‘त्यांनी’ या प्रांताचा उपयोग आपल्या संधीसाधू राजकारणासाठी केला, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधानांनी गरीब कल्याण अन्न योजनेवर राज्यभरात जागरूकता अभियान सुरू केले. आधीच्या सत्ताधार्यांनी गरिबांच्या अन्नधान्याची लूट केली होती, असा तीव्र प्रहार पंतप्रधानांनी केला.
कामकाज सुरळीत चालावे ही विरोधी पक्षांची इच्छा : खडगे
संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेला गोंधळ थांबवून कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने कोणताही पुढाकार घेतला नाही, विरोधी पक्षांना चर्चेसाठीही बोलावले नाही, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी आज गुरुवारी केला.
खडगे म्हणाले की, संसदेतील गतिरोधासाठी विरोधी पक्ष जबाबदार आहे. सभागृहाचे कामकाज चालवण्याची सरकारची तयारी आहे, असा समज निर्माण केला जात आहे. कोंडी फोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना विरोधक प्रतिसाद देत नाहीत, असा दावा तथ्यहीन असल्याचे ते म्हणाले.
विरोधकच चर्चेला तयार नाहीत ः रविशंकर प्रसाद
सरकार चर्चेला तयार आहे, पण विरोधकच चर्चेसाठी तयार आणि गंभीर नाहीत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी आज केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पेगाससवर मंत्री संसदेत भूमिका मांडत असताना विरोधी सदस्यांनी त्यांच्या हातातील कागद फाडून फेकले. चर्चाच करायची नसल्यामुळे विरोधकांनी असा प्रकार केला, विरोधक या मुद्यावर गंभीर नसल्याचे यातून दिसून येते. विरोधकांच्या मनमानीमुळे सरकारी तिजोरीचे १३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.